भटक्या कुत्र्यांचा प्राणी संग्रहालयातील काळवीटांवर जीवघेणा हल्ला; चार काळवीटांचा दुर्दैवी अंत

1

-तुटलेल्या भिंतीतून केला कुत्र्यांनी शिरकाव

पुणे, दि.०७ (पीसीबी) : पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात भटक्या कुत्र्यांनी शिरकाव केला आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुण्याच्या प्राणीसंग्रहालयात ३४ काळवीट होते, त्यातील चार काळवीटांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने आता काळवीटांची संख्या फक्त ३० राहिली आहे.

कात्रज येथे असलेल्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या तुटलेल्या भिंतीतून भटक्या कुत्र्यांनी शिरकाव केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राणीसंग्रहालयात शिरकाव केल्यानंतर कुत्र्यांनी काळवीटांवर हल्ला केला. मृतांमध्ये दोन नर तर दोन मादी काळवीट आहेत. तर अन्य एक काळवीट जखमी झालंय. यापूर्वीही भटक्या श्वानांनी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांवर हल्ला केेल्याच्या १५ ते २० घटना घडल्या आहेत. बुधवारी सकाळी ही घटना घडली. पुणे महानगरपालिकेला या घटनेचा रिपोर्ट पाठवण्यात आला आहे.

WhatsAppShare