भंडारा डोंगराजवळ वाहनाच्या अपघातात १४ महिला वारकरी जखमी

24

देहूरोड, दि. ७ (पीसीबी) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या देहू गावाजवळ भंडारा डोंगर येथे एका खाजगी वाहनाला अपघात झाला. यामध्ये १४ वारकरी महिला जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला.

उषा तावडे (वय ४१),रुक्मिनी कातडकर (वय ५०), समिंद्ररा बाई गिरणारे (वय ५५), शोभा नरवडे(वय ४०), रासकरबाई अंबोरे (वय ३९), कौसरबाई गिरणारे (वय ६०), शोभा पैठणकर या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर लिलाबाई अंबोरे(वय ४५), मनताबाई इंगळे (वय ४०), गोदावरी अंबोरे (वय ४५), शकुंतला केवट (वय ५५), शारदाबाई गिगणारे (वय ३०) या महिला किरकोळ जखीम झाल्याने त्यांना देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासीठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगराच्या पायथ्याला एका खाजगी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात १४ वारकरी महिला जखमी झाल्या. जखमी झालेल्या महिलांपैकी एका महिलेचा खांदा निखळला आहे. तर एका महिलेच्या नाकाला गंभीर जखम झाली आहे.