ब्रेकअपबद्दल मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही – श्रुती हासन

337

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – कलाविश्वात सेलिब्रिटींच्या अफेअर्स, ब्रेकअप व पॅचअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. काही सेलिब्रिटी त्यांच्या नातेसंबंधांवर खुलेपणाने बोलतात तर काहीजण त्यावर मौन बाळगणे पसंत करतात. अभिनेत्री श्रुती हासनने तीन वर्षांपूर्वी ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिचा ब्रेकअप झाला. इटालियन बॉयफ्रेंड मायकल कोर्सेल याच्याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलेपणाने व्यक्त झाली.

लक्ष्मी मंचू सूत्रसंचालन करत असलेल्या ‘फीट अप विथ द स्टार्स’ या रिअॅलिटी शोमध्ये श्रुतीने हजेरी लावली होती. या शोमध्ये एक्स बॉयफ्रेंड मायकलविषयी श्रुती म्हणाली, ”मी आधी फार शांत स्वभावाची होते. माझ्या निरागस स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला. मी फार भावनिक असल्याने माझ्यावर हक्क गाजवणे अनेकांसाठी सोपे होते. रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाल्यास, तो अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता असे मी म्हणेन.”

प्रेमात पडण्याविषयी ती पुढे म्हणाली, ”आतासुद्धा प्रेमात पडण्यासाठी असे काही खास सूत्र नाही. चांगले व्यक्ती हे कधी चांगले वागतात तर कधी वाईटसुद्धा. पण मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. माझ्यासाठी तो संपूर्ण एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले. पण त्या खास प्रेमाच्या शोधात मी कायमच असेन आणि ते जेव्हा मिळेल तेव्हा मी जगासमोर त्याचा खुलासा करेन.”

WhatsAppShare