ब्रुनेई देशात समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

146

ब्रुनेई, दि. ४ (पीसीबी) – समलिंगी संबंध ठेवणाऱ्या नागरिकांना ब्रुनेई या देशात दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा नवीन शरिया कायद्यानुसार संमत केली आहे. ब्रुनेईमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्य़ांसाठी शरिया कायद्यानुसार कडक शिक्षा जाहीर करण्यात आल्या असून जागतिक स्तरावरील राजकारणी, मानवी हक्क गट आणि प्रसिद्ध व्यक्तींनी या शिक्षांचा निषेध केला.

ब्रुनेईवर सध्या सुल्तान हस्सानाल बोल्किआ यांची सत्ता आहे. राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू करणारा मध्य पूर्व आशियामधील ब्रुनेई हा पहिलाच देश आहे. चोरी करणाऱ्यांचे हात-पाय छाटण्याची आणि बलात्कार आणि दरोडय़ासाठीही देहांताची शिक्षा या कायद्यानुसार ठोठावण्यात येणार आहे. तर प्रेषित महंमद यांचा अपमान करणाऱ्या मुस्लीम अथवा बिगर मुस्लिमांना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल. या शिक्षा ‘क्रूर आणि अमानवी’ आहेत अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी या कायद्याचा निषेध केला आहे.