ब्रिज प्रकारात प्रणब आणि शिबनाथ यांची सुवर्ण कामगिरी

97

जकार्ता, दि. (पीसीबी) – एशियाड स्पर्धेत चौदाव्या दिवशी भारताने दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. ब्रिज क्रीडा प्रकारात भारताच्या प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार या पुरुष जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. या सामन्यात ६० वर्षीय प्रणब आणि ५६ वर्षीय शशिनाथ या जोडीने ३८४ गुण मिळवले.

एशियाड स्पर्धेतले भारताचे हे १५ वे सुवर्णपदक ठरले आहे. याबरोबरच भारताने १९५१ साली दिल्लीमध्ये पार पडलेल्या पहिल्या एशियाड स्पर्धेतील १५ सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.

चीनच्या लिक्सीन यँग आणि चेन वोन जोडीला रौप्यपदक मिळाले तर इंडोनेशियाच्या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या सुमित मुखर्जी आणि देबाब्रत मझुमदार यांनी ३३३ गुणांसह नववे स्थान मिळवले तर सुभाष गुप्ता आणि सपन देसाई यांचा भारतीय संघ ३०६ अंकांसह १२ व्या स्थानी आहे.