ब्राह्मण संघटनांमध्येच आरक्षणासंदर्भात मतभेद

700

पुणे, दि. ६ (पीसीबी) – ब्राह्मण संघटनांमध्येच आरक्षणासंदर्भात मतभेद असल्याचे समोर आले आहे. याबाबत  अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक सचिन वाडे म्हणाले की, आम्ही चांगला विषय मांडला होता. मात्र लोकांना तो कळला नाही, आम्हाला पाठिंबा देण्याऐवजी लोक आम्हाला नावे ठेवू लागले आणि वाद घालू लागले.  अखिल भारतीय पेशवा संघटना ही पुण्यातील शिवाजी नगर भागातली संघटना आहे.  

या संघटनेने ब्राह्मणांना १० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी सरकारकडे केल्याची माहिती सचिन वाडे पाटील यांच्या फेसबुक पोस्टवरून समोर आली. या मागणीबाबत संघटनांमध्येच मतभेद असल्याने सध्या तरी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली नाही, असे वाडे यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

या संघटनेने “ब्राह्मण समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, ब्राह्मण समाजासाठी श्रीमंत बाजीराव पेशवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करावी व त्यात दरवर्षी ५०० कोटींची तरतूद करावी. भूमिहिन ब्राह्मणांना २ एकर गायरान जमीन सरकारने द्यावी. ब्राह्मण समाजासाठी अॅट्रॉसिटीप्रमाणे कायदा लागू करावा व समाजाची बदनामी करणाऱ्या व तेढ निर्माण करणाऱ्या पुस्तकांवर बंदी आणावी. ग्रामीण किंवा शहरी भागात राहाणाऱ्या ज्या ब्राह्मण व्यक्तीस घर नाही त्यास इंदिरा आवास योजने अंतर्गत घर द्यावे. महिला सबलीकरण अंतर्गत शहरी/ग्रामीण ब्राह्मण विधवा/ अनाथ/ वयोवृद्ध महिलांना २ हजार रूपये महिना कायमस्वरूपी अनुदान द्यावे. वेदपाठ शाळेला शासकीय अनुदान द्यावे. शनिवार वाड्याचे पुनर्निमाण करावे,” अशा अनेक मागण्या केल्या आहेत.