ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या वतीने उत्साहात रक्षाबंधन

113

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पिंपरी सेवा केंद्राच्या वतीने पोलीस स्टेशन, मिलिटरी ऑफिस,रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, वृत्तपत्र विभाग, विविध रुग्णालये, बँक, महाविद्यालये, राजकीय व सामाजिक कार्यालय, धार्मिक संस्था  या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक आर.बी.उंडे, यशवंत गवारे, कॅप्टन नवनीत कुमार  ,खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, देहू देवस्थान अध्यक्ष मधुकर मोरे, बाळासाहेब मोरे, संजय मोरे, नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, संतोष कोकणे, उषा काळे, उषाताई वाघेरे, संजोग वाघेरे, बँक मॅनेजर रमेश हिंदुजा , प्रा.उत्तम पाटील व इतर कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचे महत्व सांगण्यात आले.

ब्रम्हाकुमारी सुरेखादीदी, सुप्रियादीदी, श्रद्धादीदी, मंगलदीदी, अपर्णा विटवेकर, रुपाली जगताप, अन्नपूर्णा जेवरानी, अनुप पाटील, सरदार पाटील, मयूर पाथरकर, निलेश थोरात यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.