बोईसरमध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

208

ठाणे, दि. २ (पीसीबी) – बोईसरमध्ये दहिहंडीनिमित्त बॅनर आणि पक्षाचे झेंडे लावण्यावरुन शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (रविवारी) राडा झाला. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला मारहाण कऱण्यात आली. 

बोईसरमध्ये शिवसेना गेल्या दहा वर्षांपासून दहिहंडी उत्सव करीत आहे. तर, भाजपाही यंदापासून येथे दहिहंडी उत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे मोठी तयारी सुरु केली होती. यादरम्यान, शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे बॅनर आणि झेंडे लावण्यावरून वाद निर्माण झाला.

यावेळी बोईसर येथील डी. जे. नगर सर्कस ग्राउंड येथे शिवसेनेचे बोईसर विधानसभा प्रमुख नीलम संखे यांना किरकोळ मारहाण झाली. या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.