“बॉलिवूड कलाकार मदत करतात, पण त्याची जाहिरात करत नाही” – अमिताभ बच्चन

237

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – “बॉलिवूड कलाकार मदत करतात, पण त्याची जाहिरात करत नाही. त्याचपैकी मी एक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले आहे .  ‘कोन बनेगा करोडपती’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. मात्र या पुरग्रस्तांकडे बॉलिवूडकरांनी पाठ फिरवली असल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याबाबत आवाज उठवला होता. यासंदर्भात विचारण्यात आले असता अमिताभ पुढे म्हणाले, पुरग्रस्तांना मदत करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांना कशाप्रकारे आवाहन करता येईल याबाबत देखील आमचे बोलणे झाले आहे.