बॉलिवुडचा प्रसिद्ध डान्सर अभिजित शिंदेची गळफास घेऊन आत्महत्या

1008

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – बॉलिवुडचा प्रसिद्ध डान्सर अशी ख्याती असलेल्या अभिजित शिंदेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी अभिजित शिंदेने एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत बँकेचे अकाऊंट मुलीच्या नावे केले असल्याचे लिहिले आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले त्यांनी तिथून अभिजितचा मृतदेह ताब्यात घेतला.

अभिजित शिंदेने आत्तापर्यंत सलमान खान, तुषार कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंह या सह अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिजित शिंदेची पत्नी त्याला सोडून गेली होती त्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजितला तीन महिन्यांची मुलगी आहे. अभिजितच्या पत्नीने मुलीला भेटण्यास मनाई केली होती. त्यामुळे तो आणखी निराश झाला होता. तसेच हाती काही काम मिळत नसल्याने त्याला पैसे कसे मिळवायचे याचेही टेन्शन होते. या प्रकरणी अभिजितच्या पत्नीचीही चौकशी करण्यात येणार आहे. नैराश्यातून अभिजितने स्वतःचे आयुष्य संपवले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.