बॉबी यादव टोळीचा म्होरक्या बॉबी आणि साथीदार कल्पेश पवारची पोलिसांनी काढली धिंड

106

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – बॉबी यादव टोळीचा म्होरक्या बॉबी ऊर्फ सुरेश विलास यादव आणि कल्पेश संदीप पवार या दोघांची निगडी पोलिसांनी आकुर्डी परिसरात धिंड काढली. बॉबी यादव टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी 15 एप्रिल रोजी मोक्काची कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख बॉबी ऊर्फ सुरेश विलास यादव (वय 33, रा. आकुर्डी), सनी ऊर्फ प्रवीण बाबुलाल सरपट्टा (वय 29, रा. बबन पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), प्रसाद ऊर्फ तांब्या लक्ष्मण सुतार (वय 26, रा. देवेंद्र अपार्टमेंट, पंचतारानगर, आकुर्डी), विकी पोपट वाघ (वय 26, रा. राहुल शिंदे बिल्डींग, पंचतारानगर, आकुर्डी), जिग्नेश परशुराम सावंत (वय 30, रा. शरदनगर कॉलनी, मोरेवस्ती, चिखली), नरेंद्र ऊर्फ गुंड्या बाबुलाल सरपट्टा (वय 27, रा. बबन पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), कल्पेश संदिप पवार (वय 25, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999) कारवाई केली आहे.

यातील टोळी प्रमुख बॉबी आणि सदस्य कल्पेश पवार या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सनगर येथील डोंगराळ भागातून अटक केली. बॉबी यादव याच्या विरोधात मारहाण, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आणि इतर असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. तर कल्पेश पवार विरोधात मारहाण, शस्त्र बाळगणे आणि इतर असे तीन गुन्हे दाखल आहेत.

या दोन्ही कुख्यात गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांची आकुर्डी परिसरातून पोलिसांनी धिंड काढली.

WhatsAppShare