बॉईल अंडे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

4

भोसरी, दि. २६ ९पीसीबी) – बॉईल अंडे न दिल्याने हातगाडीवरील तरुणाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) रात्री दहा वाजता आळंदी रोड भोसरी येथे अन्नपूर्णा तडका पावभाजी नावाच्या हातगाडीवर घडली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अभिषेक नलावडे, त्याचे तीन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महेश कमलाकर कल्याणकर (वय 30, रा. संभाजीनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत शनिवारी (दि. 24) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याणकर यांची आळंदी रोड भोसरी येथे सकुबाई गभाजी गवळी उद्यानजवळ अन्नपूर्णा तडका पावभाजी नावाची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता आरोपी फिर्यादी यांच्या हातगाडीजवळ आले. कल्याणकर यांनी आरोपींना बॉईल अंडे दिले नाहीत, या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. आरोपी अभिषेक याने हातगाडीवरील पळ्याने कल्याणकर यांच्या डोक्यात मारले. दुस-या आरोपीने हातगाडीला लावलेल्या लाकडी बांबूने, तिस-या लोखंडी रॉड, तर चौथ्याने हातगाडीवरील फ्रायपॅनने मारले. यामध्ये कल्याणकर यांच्या डोक्यात, पाठीत, हाता पायावर गंभीर दुखापत झाली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare