बैलगाडा शर्यत ‘पुन्हा’ सुरु होणार

150

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात काल पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाली असून यासंदर्भात वटहुकूम काढून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. परंतु हा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्या संदर्भामध्ये मागील आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती. त्यामध्ये मी बोललो होतो परत एकदा मुंबईला गेल्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा केला. 

सुप्रीम कोर्टमध्ये चार ते पाच वेळा देशाच्या न्यायमूर्तींकडे अर्ज सादर केला आहे. ज्या वेळेला मुख्य न्यायमूर्ती 5 न्यायमूर्तींचे बेंच स्थापन करतील त्यावेळी आपण आपले सर्वात उत्तम वकील देऊ एका बाजूला हा प्रयत्न आपण करू तर दुसऱ्या बाजूला कायद्यामध्ये काही सुधारणा करता येते का या दृष्टीकोनातून प्रयत्न करत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

WhatsAppShare