बेवड्यास घरी सोडायला कार न दिल्याने तरुणास मारहाण..

218

चाकण, दि. ८ (पीसीबी) – दारू पिलेल्या एकाला घरी सोडण्यासाठी कार दिली नसल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री तीन वाजता संतोषनगर, भाम येथे घडली.

अक्षय सुभाष काचोळे (वय २६, रा. रोहकल, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत होले (रा. होलेवाडी, ता. खेड), अन्य तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या अंडाभुर्जीच्या गाडीजवळ त्यांच्या कारमधून गेले. त्यावेळी आरोपींपैकी एकजण जास्त दारू पिलेला होता. त्याला घरी सोडण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांची गाडी मागितली. फिर्यादी यांनी कार देण्यास नकार दिला. त्या कारणावरून आरोपी संकेत याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड घातला. इतर आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून खेडच्या बाजूने निघून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.