बेळगावात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा

0
416

आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावजवळील येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र मैदानावरील सभेत भिडे यांनी प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नाही. त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा, असे विधान भिडे यांना केले होते.

याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुनच बेळगाव पोलिसांनी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याआधी कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी त्याच्यावर आरोप केला होता. मात्र, त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून त्यांना क्लीन चीट दिली.