बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचे कारस्थान; राज्य सरकारने हस्तक्षेप करावा – उद्धव ठाकरे

52

मुंबई, दि. २ (पीसीबी) – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देणं हे कारस्थान आहे, राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून कर्नाटकच्या या प्रस्तावाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आक्षेप नोंदवला पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.