बेताल वक्तव्याप्रकरणी ८ दिवसात उत्तर द्या; राम कदम यांना महिला आयोगाचे आदेश

25

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत बेताल वक्तव्य केले. याची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत. महिलांबाबत वक्तव्य करताना आमदार राम कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याआधीच व्यक्त केले आहे. आता स्युमोटो दाखल केल्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणात ८ दिवसात उत्तर द्यावे असेही आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.