बेगडेवाडीत रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

223

देहूरोड, दि. २४ (पीसीबी) – रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात  तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी एकच्या सुमारास बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. मृत तरुणाची ओळख पटलेली नाही.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष असून  तो रंग गोरा, त्याच्या अंगात राखाडी रंगाचा फूल शर्ट, राखाडी रंगाचे जॅकेट, आणि निळ्या रंगाची जीन्स आहे, मृताची उंची ५.८ फूट आहे. त्याच्या उजव्या हातावर ‘साईराम’ असे गोंदलेले आहे. तर डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजीत R असे लिहिलेले आहे.

वरील वर्णनाच्या तरुणाबाबत माहिती असल्यास देहूरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.