बेकायदेशीरपणे घरावर ताबा मारून महिलेस घरात जाण्यास मज्जाव

346

वाकड, दि. ३ (पीसीबी) – महिलेने विकलेल्या खोलीचे पैसे मागितले असता खोली विकत घेणाऱ्यांनी महिलेला शिवीगाळ करून तिला तिच्या घरात जाण्यास मज्जाव केला. तसेच एका डबल रूममध्ये ताबा मारून त्यांचे पाण्याचे कनेक्शन देखील कट केले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2014 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत क्रांतिवीर कॉलनी, नढेनगर, काळेवाडी येथे घडली.

अखिल इकबाल मणेर, शहनाज इकबाल मणेर, एक महिला (सर्व रा. क्रांतिवीर कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपींना एक खोली विकली आहे. त्याचे पैसे फिर्यादी यांनी मागितले. त्यावरून आरोपींनी वारंवार शिवीगाळ केली. मागील चार महिन्यांपासून फिर्यादीला त्यांच्या रूममध्ये जाऊ न देता त्यांची अडवणूक केली. त्यांच्या पहिल्या मजल्यावरील डबल रूमचा आरोपींनी अनधिकृतपणे ताबा घेतला. 28 नोव्हेंबर रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या घरातील पाण्याचे कनेक्शन बंद केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.