बेकरीवर पोलसांनी टाकला छापा… सापडला हजारो रुपयांचा गुटखा

1

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – हिंजवडी पोलिसांनी कासारसाई येथील एका बेकरीमधून 53 हजार 36 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी साडेचार वाजता करण्यात आली.

लालसिंग उर्फ राजू तुलसीराम कुशवाहा ठाकूर (वय 45, रा. कासारसाई, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह शिवा (पूर्ण नाव माहिती नाही. रा. सोमाटणे फाटा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक आतिक शेख यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला कासारसाई येथील रोनाक बेकरीमध्ये साठवून ठेवला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकून 53 हजार 36 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. लालसिंग याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare