बेंगळुरुमध्ये काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्फोट; एकाचा मृत्यू

116

बेंगळुरु, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर आज (रविवारी) सकाळी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. ही घटना बंगळुरूमधील काँग्रेस आमदार मुनीरथना यांच्या घराबाहेर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार मुनीरथना यांचे राजेश्वरी नगर येथील घराजवळ आज (रविवारी) सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. व्यंकटेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे. स्फोट घडवला? की नेमका स्फोट कशाचा झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.