बुधवार पेठेतील त्या वेश्याकडे पुन्हा यायचे नाही; धमकी देत एकावर चाकूने प्राणघातक हल्ला

95

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी परत त्या वेश्याकडे यायचे नाही, अशी धमकी देत चौघा जनांच्या टोळीने एकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात असलेल्या कुंटनखान्या जवळ घडली.

नितीन हांगे (वय २७) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांने समीर पठाण, कादिर आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारां विरुध्द फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन आणि आरोपी समीर हे एकमेकांच्या ओळखिचे आहेत. फिर्यादी नितीन हे काही दिवसांपूर्वी बुधवार पेठेत एका मुलीकडे वेश्यागमनासाठी गेला  होता. त्याचदरम्यान आरोपी समीर पठाण हा सुद्धा त्याच मुलीकडे आला होता. तेथे फिर्यादींना पाहून त्याने ‘परत या मुलीकडे आलास, तर तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी त्याच मुलीकडे वेश्यागमनासाठी आल्याची माहिती आरोपी समीर पठाण याला समजताच त्याने इतर साथीदारांना बोलावून घेत नितीन हांगे याच्यावर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. नितीनची प्रकृत्ती गंभीर असून त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चारही आरोपी अद्याप फरार आहेत. फरासखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.