बीडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून भाजप आमदार आर.टी. देशमुख यांना मारहाण

424

बीड, दि. २२ (पीसीबी) – बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (बुधवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तालुक्यात वातावरण तंग झाले आहे.  

देशमुख राजेवाडी येथील एका कार्यक्रमावरून परतत  होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चार वर्षात विकासकामे का केली नाहीत, असा सवाल करत    देशमुख यांना गाडीतून बाहेर ओढून  मारहाण केली. यावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील मारहाण करण्यात आली. तसेच त्याचा  मोबाइल फोडण्यात आला. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आमदार  देशमुख  यांना सुरक्षितपणे घरी सोडले.