बिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण ? हे सांगू का – मुख्यमंत्री

90

नागपूर, दि. ४ (पीसीबी) – विरोधकांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे बिल्डरांशी साटेलोटे असल्याचा केलेला आरोप धादांत खोटा आहे, असे सांगून बिल्डर भतिजाचे मागील सरकारमधील चाचा कोण होते, हे अधिवेशनात सांगू, असा सुचक इशारा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला. मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.  

जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यास सरकार तयार आहे. विरोधकांच्या अफवांना  राजकीय उत्तर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्याचे धोरण ३० वर्षांपासून अस्तित्वात आहे. दरम्यान, ज्या जमिनीबाबत आरोप केलेले आहेत, ती सिडकोची जमीन नसून शेतजमीन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्या जमिनीचे व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अखत्यारीत झाले आहेत. या प्रकरणाची फाईलही माझ्याकडे आलेली नाही. तसेच वाटप केलेल्या दोनशे सातबारांची विक्री जुन्या सरकारच्या कारकिर्दीत झाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या अफवांवर विश्‍वास ठेवण्याचे कारण नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.