बिर्ला रुग्णालयावर आणखी एक गुन्हा; दहा महिन्यांचे बाळ दगावले, स्वाभिमानी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

97

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – शासकीय योजनेचा लाभ न मिळावा म्हणून वैद्यकीय खर्चाचे कोटेशन देण्यास विलंब लावल्याने एका गरीब कुटूंबातील दहा महिन्यांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या गलथानपणाचा जाब विचारण्यास गेलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्याना माहिती देण्यास टाळाटाळ करुन दमदाटी करत चिंचवड येथील अदित्य बिर्ला रुग्णालयातील बाऊन्सरने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.