बिबवेवाडीत वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

201

पुणे, दि. २० (पीसीबी) – वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन बिबवेवाडी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथे १७ नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी घडला.

याप्रकरणी पिडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संदीप आनंदराव देवताळे (वय ४०, रा़ बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप देवताळे याने त्याच्या घरी कोणी नसताना पिडीत अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले़ तिच्यावर अत्याचार केले़. तू हे कोणाला काही सांगू नको नाही तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली़. त्यानंतर त्याने या मुलीला संपर्क करण्यासाठी स्वत:कडील मोबाईल व सिमकार्डही दिले़ व तू माझ्याशी फोनवर बोलली पाहिजे, अशी धमकी दिली़ व १०० रुपये दिले़. या प्रकारानंतर त्याने या मुलीला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले़. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी संदीप देवताळे याला अटक केली आहे़. पोलीस उपनिरीक्षक एस.एस.सुतार तपास करत आहेत़.