बिबवेवाडीत कारने वाहतूक पोलिसाला उडवले; प्रकृती गंभीर

91

बिबवेवाडी, दि. २५ (पीसीबी) –  कर्तव्य बजावत असताना एका वाहतूक पोलिसाला कारने उडवल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद मार्गावर घडली.

बाळासाहेब दगडे असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकानंद मार्गावरील बिबवेवाडी कोंढवा रस्ता चौकात वाहतूक सिग्नलचे नियमन करत असताना बिबवेवाडी कडून कोंढव्याच्या दिशेने जाणारी ट्रँव्हल्स कंपनीची स्विफ्ट डिज़ायर कार क्रं. (एम.एच/१२/के.एन१४४६) घेऊन चालक दत्तात्रय जाधव भरधाव वेगात चालला होता. उजवीकडे वळताना चौकातील वाहतूक पोलिस त्याला दिसला नाही. त्यामुळे त्याने दगडे यांना जबर धडक दिली. धडकेत दगडे यांचे डोके कारच्या पुढील काचेवर आदळले. त्यामुळे कारची काच फुटली असून, दगडेंच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी दत्तात्रय जाधवला कारसह अटक केली आहे.