बिबट्याच्या दोन बछड्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

0
467

पुणे, दि. २० (पीसीबी) – बिबट्याच्या दोन बछड्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना राजगड पोलिसांनी आज (सोमवार) सकाळच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदी करत असताना अटक केली. चालकाचे लायसन्स तपासताना पोलिसांना गाडीतून प्राण्याचा ओरडण्याचा मोठा आवाज आला. गाडीची तपासणी केल्यावर बास्केटमध्ये बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

बिबट्याच्या दोन्ही बछडे तीन ते चार महिन्यांचे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हबीब सय्यद (वय ३१, रा. कवठे यमाई, ता. शिरूर), इरफाज मेहबूब शेख (वय ३३ रा. सोमजी गांव,खडी मशिन शेजारी कोंढवा बुद्रुक), आयाज बक्शुलखान पठाण, (वय ४० रा.घोरपडी पेठ पोलीस चौकी जवळ) यांना ताब्यात घेतले आहे. तर बिबट्याच्या बछड्यांना वन विभागाने कात्रज येथील प्राणी अनाथायलायत दाखल केले आहे.