बिटकॉईन घोटाळा प्रकरणात सेलिब्रिटी अडचणीत; अनेकांनी बीटकॉईनचे प्रमोशन केल्याचा दावा

30

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचे प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे.

बिटकॉईन व्यवहारातील बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी (दि.५) राज कुंद्रा यांची तब्बल ९  तास कसून चौकशी केली. बिटकॉईन प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत बॉलिवूडमधल्या अनेकांची या घोटाळ्यात नावे बाहेर आली.