बिजलीनगरमध्ये 24 हजारांची घरफोडी

94

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – बिजलीनगर, चिंचवड येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 24 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना 9 मे रोजी दुपारी उघडकीस आली. पंकज सुरेश महाजन (वय 29, रा. बळवंतनगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत बुधवारी (दि. 12) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महाजन यांचे घर 29 एप्रिल रोजी रात्री 8 ते नऊ मे रोजी दुपारी एक वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून लॅपटॉप, चांदीची अंगठी असा 24 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare