बिकाऊ, देशद्रोही पत्रकारांनी मला बॅन करावंच – कंगना रणौत

83

मुंबई, दि, ११ (पीसीबी) – काही पत्रकार चांगले आहेत, परंतु काही पत्रकार बिकाऊ नी देशद्रोही आहेत असे सांगत कंगना रणौतने अशा पत्रकारांनी मला बॅन करावंच असे सांगत आव्हानाची भाषा व्यक्त केली आहे. कंगनाची बहीण रंगोली चंडेलने ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. ‘जजमेंटल’ सिनेमाच्या एका प्रेस कॉन्परन्स दरम्यान कंगनाची एका पत्रकाराशी बाचाबाची झाली होती. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी कंगनाला बॅन करण्याचा इशारा दिला होता.

काही मोजके पत्रकार आहेत, ते बिकाऊ आहेत व देशद्रोही आहेत असे सांगत आपण त्यांना किंमत देत नसल्याचे कंगना म्हणाली आहे. मी काही समाजसेवेची कामे केली होती त्यांचीही या पत्रकाराने खिल्ली उडवली होती असा आरोप करत लिबरल सेक्युलर म्हणवणारे हे पत्रकार ढोंगी असल्याचे कंगना म्हणाली आहे. अशा पत्रकारांना आपण किंमत देत नसून त्यांनी खुशाल माझ्यावर बंदी घालावी असे आव्हानच तिने दिले आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.