बावधनमध्ये हिऱ्यांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

86

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले हिरे, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी सव्वासातच्या सुमारास अपूर्वगड आपार्टमेंट, बावधन येथून समोर आली.

याप्रकरणी शीतल समीर पराडकर (वय ४४, रा. अपूर्वगड आपार्टमेंट, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पराडकर यांचा बावधन येथील अपूर्वगड आपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. गुरुवार ते शुक्रवार दरम्यान त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोने, हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा ६ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.