बावधनमध्ये नराधम बापानेच केला स्वत:च्या कर्णबधीर मुलीवर अत्याचार

510

हिंजवडी, दि. ९ (पीसीबी) – बावधन येथे एका नराधम बापानेच स्वत:च्या कर्णबधीर मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वेळोवेळी बावधन येथील घरात घडली.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने हिंजवडी पोलिसात तक्ररा दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार नराधम बापावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या एका कर्णबधीवर मुलीवर तिच्या नराधम बापानेच लैंगिक अत्याचार केला. आई घरात नसताना त्याने मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. हि बाब आईच्या लक्षात येताच तिने हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.