बाळासाहेब थोरात यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

8

मुंबई,दि.९ (पीसीबी) : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. थोरातांच्या शासकीय बंगल्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती.

बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते. चाचणी करुन घेतली होती. काल रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. ती निगेटिव्ह आली, मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन दिली.

WhatsAppShare