बाल विवाह केल्या प्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल

68

खेड, दि. २७ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याबद्दल पती आणि मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 जुलै 2021 रोजी खेड तालुक्यातील कुरकुंडी ठाकरवस्ती येथे घडला.

याप्रकरणी पिडीत मुलीचा 19 वर्षीय पती आणि पिडीत मुलीचे वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत 17 वर्षीय मुलीचा आरोपी वडील याने 19 वर्षीय तरुणासोबत विवाह लाऊन दिला. त्यानंतर पतीने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला तीन महिन्यांची गरोदर केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, बाल विवाह कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.