बालाजीनगर येथे ७ दुचाक्या जळून खाक; आगीचे कारण अस्ष्ट

139

पुणे, दि. ११ (पीसीबी) – रस्त्याच्या कडेला लावलेल्या ७ दुचाक्या अचानक जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी (दि.१०) मध्यरात्री अडीजच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर एलोरा पॅलेसजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस जवळील रस्तयावर पार्क केलेल्या ७ दुचाक्या अचानक पेटल्या. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणली. मात्र तोवर ७ ही दुचाक्या जवळून खाक झाल्या.  या गाड्या जेथे पार्क करण्यात आल्या होत्या, त्याच्या वरील बाजूने काही विजेच्या तारा गेल्या होत्या. या आगीमध्ये त्या ताराही जळून खाक झाल्या. ही आग नेमकी गाड्या पेटवल्यामुळे लागली की या गाड्यांच्या वरुन गेलेल्या तारांच्या शार्ट सर्कीटमुळे हे अद्याप समजू शकलेले नाही. सहकारनगर पोलिस तपास करत आहेत.