बार्शीमध्ये राम कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल  

240

सोलापूर, दि. ७ (पीसीबी) –  महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम चांगलेच अडचणीत आले आहेत. घाटकोपरनंतर बार्शीमध्‍येही त्‍यांच्‍याविरोधात अदखलपात्र गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍याविरोधात हा गुन्‍हा दाखल केला  आहे. कलम ४०४ व ५०५ बी अंतर्गत त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे.

गुन्‍हा अदखलपात्र असल्‍यामुळे सध्या तरी  त्‍यांना अटक होण्‍याची शक्‍यता नाही. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्‍यास न्यायालय याप्रकरणी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्‍त्‍वाचे ठरणार आहे. तसेच राम कदमांविरोधात राज्‍यात ठिकठिकाणी पोलिसांत तक्रार दिली जाईल, असे राष्‍ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्‍यात आले आहे.