बारा वर्षांच्या मुलाने केला चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

767

उदयपूर, दि. ३ (पीसीबी) – राजस्थानमधील उदयपूर येथे एका १२ वर्षांच्या मुलाने चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या मुलाने तिला स्वत:च्या घरी नेत तिच्यावर बलात्कार केला.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आई-वडीलांनी झाडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी १२ वर्षीय मुलाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयपूरमधील झाडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांची मुलगी तिच्या आई- वडिलांसोबत राहते. मुलीचे आई-वडील हे बांधकाम साईटवर मजूर आहेत. शनिवारी (दि.१) दुपारी पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान शेजारी राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाने तिला स्वत:च्या घरी नेले. मुलाच्या घरी कोणीही नव्हते. त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला. यानंतर मुलीला पुन्हा घरी सोडून दिले. घरी परतल्यावर पीडित मुलीला रक्तस्त्राव सुरु झाला. हा प्रकार तिच्या आई- वडीलांना लक्षात आला. त्यांनी मुलीला रुग्णालयात नेले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. ही माहिती झाडोल पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत तिच्या शेजारी राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाला अटक केली. त्याने बलात्कार केल्याचे कबुल केले असून  त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.