बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करा – भाजप खासदार, आमदारांची मागणी

52

बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करा – भाजप खासदार, आमदार यांची मागणी

पुणे, दि. २७ (पीसीबी) : करोना विषाणू प्रादूर्भावाच्या संकटामुळे बारा बलुतेदार आर्थिक अडचणीत असल्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या खासदार, आमदार यांच्याकडून विधानभवन येथे आंदोलन करण्यात आले.

खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर आणि सुनील कांबळे यांनी आंदोलन करून राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.  करोना विषाणू प्रादूर्भावाच्या संकटामुळे  टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील बारा बुलतेदार, रिक्षाचालक, कुंभार, लाँड्रीचालक, नाभिक आणि अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अनेक व्यावसायिकांना बँके च्या कर्जाचे हप्ते भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक पॅके ज जाहीर करावे, याकडे आंदोलनाद्वारे लक्ष वेधल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

WhatsAppShare