बारावी फेरपरीक्षेत २२.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा टक्का घसरला

48

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी) दुपारी जाहीर करण्यात आला. परीक्षा दिलेल्या १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २२. ६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का घसरला आहे.