बारामतीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

80

पुणे, दि. १५ (पीसीबी) – बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना शुक्रवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास घडली.

शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५, रा. बारामती, वडगाव निबांळकर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी हे दोन एकर कोरडवाहु शेती कसायचे. त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे २ लाख ४१ हजार रूपयांचे कर्ज होते. ते कर्ज फेडता येत नसल्याने काळजीत होते. शुक्रवारी सकाळी गावात संतराज महाराजांची पालखी येणार होती. यासाठी जातो म्हणुन ते घराबाहेर पडले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास गावठाण जवळ रमेश चांदगुडे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.