बारामतीत सुभद्रा मॉलवरुन पडल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

98

बारामती, दि. १० (पीसीबी) – बारामती एमआयडीसी येथील सुभद्रा मॉल वरुन पडल्याने एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास घडली.

पार्थ प्रशांत हिंगाने (वय ५ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे आहे. बारामती पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८ वाजल्यापासुन पार्थ हा सुभद्रा मॉलपासून बेपत्ता होता. पार्थचे नातेवाईक ,पोलीस सर्व मिळून त्याचा शोध घेत होते. त्याचा शोध घेत असताना मॉलच्या पार्किंग मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा वरुन पडल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.  अधिक तपास हवालदार दत्तात्रय सोननिस करत आहेत.