बारामतीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

871

बारामती, दि. २२ (पीसीबी) – टवाळखोर तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात विष  प्राश्न करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (बुधवार) बारामतीतील सोनगाव येथून उघडकीस आली.

आकांशा प्रदीप दरेकर (वय १६) असे आत्महत्या केलेल्या तरुणीची नाव आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आकांशाला  महेश मासाळ हा तरुण पाठलाग करुन छेडत होता. याबाबत तीने घरच्यांनाही सांगितले होते. महेशच्या त्रासाला कंटाळून तिने ११ ऑगस्टला विषारी औषध प्राश्न करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आज (बुधवार) आखेर एका खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.   याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बारामती ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.