बारामतीत अल्पवयीन चोरांकडून साडेचार लाखाच्या १५ दुचाक्या जप्त

107

बारामती दि. २७ (पीसीबी) –  बारामती शहरातील गुन्हे शोध पथकाने दोन अल्पवीन मुलांकडून तब्ब्ल साडेचार लाख रुपये किंमतीच्या १५ दुचाक्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई गुरुवार (दि.२६) करण्यात आली.

याप्रकरमी १७ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मराठा मोर्चाच्या पार्श्वभुमीवर बारामती शहरात पेट्रोलींग सुरु होते. यावेळी पोलीसांनी इंदापुर चौकात क्रमांक नसलेल्या स्प्लेंडरवरील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलीसांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. या दुचाकी त्यांनी करमाळा, खटाव सह इंदापुर भागात विकल्याची माहिती दिली. पोलीसांनी त्या सर्व दुचाक्या जप्त केल्या आहेत. बारामती पोलिस अधिक तपास करत आहेत.