बारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी

233

बारामती, दि. २२ (पीसीबी) – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज (शुक्रवार) बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील बदल व तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

नायडू यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजमधील शरद पवार यांच्या वस्तुसंग्राहलयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यानंतर दुपारी नायडू यांनी शरद पवारांच्या माळेगाव येथील घरी सहकुटुंबासह भोजन घेतले.

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजता नायडू यांचे बारामतीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी केले.

WhatsAppShare