बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

1115

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – एका नराधम बापाने आपल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना देहूरोड येथील बर्लोता नगर मधील पुष्पा अपार्टमेंट येथे शनिवारी (दि. १८) सकाळी सहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पिडीत १३ वर्षीय मुलीने वडिल रामचंद्र उत्तम पवार (वय ३८, रा. बर्लोता नगर, पुष्पा अपार्टमेंट, देहूरोड) यांच्या विरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत १३ वर्षीय मुलगी ही आई-वडिलांसोबत देहूरोड येथे राहते. झोपेतून लवकर उठायची सवय असल्याने शनिवारी ती सकाळी सहा वाजता जागी झाली. जाग येताच तिचे वडिल रामचंद्र पवार तिच्या पायाजवळ बसल्याले तिला दिसून आले. यावेळी त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करुन गप्प झोपून राहण्यास सांगितले. यावर घाबरलेल्या मुलीने स्वत:ला वडिलांच्या तावडीतून सोडवून घडलेले प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी पिडीत मुलीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.