बापरे! रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनालाही आता सुरक्षेची गरज

103

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – इंद्रायणीनगर भोसरी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकचे मागील बाजूचे दोन टायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना चार जून रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत योगेश रवींद्रआप्पा निर्मळे (वय 39, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा ट्रक एक जून रोजी सायंकाळी सहा वाजता इंद्रायणीनगर भोसरी येथे इंद्रायणी नगर ते स्पाईन रोड या मार्गावर रस्त्याच्या बाजूला पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या मागील बाजूचे 50 हजार रुपये किमतीचे दोन टायर डिक्ससह चोरून नेले. हा प्रकार 4 जून रोजी सकाळी उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare