बापरे काय म्हणावं याला!! कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल लोखंड आणि स्टील

85

नाशिक, दि.१० (पीसीबी) – देशभर कोरोनाने थैमान घातलं आहे. आता लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरु आहे. मात्र आता एक अजब बातमी समोर येत आहे. नाशिक शहरातील सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा अजब प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील चक्रावले आहेत.

दरम्यान, ९ मार्च रोजी अरविंद सोनार यांनी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता प्रतिपिंड तयार होणार अशी त्यांची भावना असताना घडलं भलतंच. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली. तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी घडला प्रकार खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना सांगितलं असता ते देखील चक्रावले. दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नवीन बाजी यांनी देखील यांना देखील याबाबद्दल आश्चर्य वाटले. तरी हा सर्व प्रकार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कृष्णा चांदगुडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा विज्ञानाचा भाग असून चमत्कार नाही, अस त्यांनी सांगितले.

WhatsAppShare