बापरे! एचआयव्हीबाधित महिलेच्या शरीरात कोरोना विषाणूने तब्बल 32 वेळा बदलली रचना

116

दक्षिण आफ्रिका, दि.०७ (पीसीबी) : दीड वर्षापासून कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला आहे. कोरोनाचा विषाणू आपले स्वरूप बदलत असल्याने शास्त्रन्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांबाबतची एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. एका एचआयव्ही बाधित महिलेने कोरोनाच्या संसर्गाशी तब्बल सात महिने झुंज दिली. यादरम्यान, कोरोना विषाणूने 32 वेळा स्वरूप बदलले.

दक्षिण आफ्रिकेतील दरबन येथील क्वाझुलू-नेटल विद्यापीठाच्या संशोधकांनी याचा खुलासा केला आहे. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एचआयव्ही बाधितांमधील रोगप्रतिकारक शक्तींचा प्रतिसाद समजून घेण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 300 एचआयव्ही बाधित महिलांची निवड करण्यात आली होती. यादरम्यान, महिलेच्या शरीरातील कोरोना विषाणूच्या संरचनेतील जवळपास 12 म्युटेशन समोर आले. या संशोधनादरम्यान चार एचआयव्ही बाधितांवर एका महिन्याहून अधिक काळ कोरोनाचे उपचार सुरू होते. संशोधनाशी निगडित तुलिओ डी ओलिवेरा यांनी सांगितले की, अशा प्रकारची अन्य काही प्रकरणे समोर आल्यास एचआयव्ही बाधित रुग्णांमधील कोरोनाच्या नव्या स्वरूपांची माहिती घेणे शक्य होईल.

WhatsAppShare