बापटसाहेब तुम्ही साताऱ्यातून उभे रहावे,  मी माघार घेईन – खासदार उदयनराजे

117

सातारा, दि. २ (पीसीबी) – बापटसाहेब, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेब तुमची इच्छा असेल, तर तुम्ही  साताऱ्यातून उभे रहावे, मी माघार घेईन, अशी ऑफर साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दिली.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सातारा शाखेचे उद्‌घाटन गिरीश बापट  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.